राजमुद्रा : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना महाविकास आघाडीत ठिणगी पडली आहे.. एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या अहिल्यानगर मतदारसंघाची जागा शरद पवार गटाला सुटल्याने आघाडीत बिघाडी निर्माण झाली आहे.. या मतदारसंघात राष्ट्रवादीच्या शरद पवार पक्षाकडून माजी महापौर अभिषेक कळमकर यांना उमेदवारी जाहीर झाली. यानंतर लगेचच मविआत बंडखोरीचे निशाण फडकवण्यात आले. या उमेदवाराच्यां विरोधात शिवसेना ठाकरे आणि काँग्रेसने बंडखोरीचे निशाण फडकवला आहे.
या मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या दिवशी अर्ज दाखल करताना काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी अर्ज दाखल केला. त्यापाठोपाठ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) पक्षाने बंडाचे निशाण हाती घेतले.
झाले.यामध्ये जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, माजी महापौर भगवान फुलसौंदर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यामुळे आता महाविकास आघाडी ठिणगी पडली असल्याचे दिसून आला आहे..
अहिल्यानगर शहर मतदारसंघात माजी महापौर संदीप कोतकर देखील इच्छुक होते. यासाठी त्यांनी जिल्हाबंदी उठवण्यासाठी न्यायालयात कायद्याची जोरदार लढाई लढली. यात त्यांना यश आलं नाही.. मात्र या मतदारसंघातून मिळवण्यासाठी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील इच्छुकांनी अर्ज दाखल करत दबावतंत्र वापरले. यावर अर्ज माघारी घेण्याच्या दिवसापर्यंत कसा तोडगा निघतो, याकडे सर्वांचेच लक्ष लागलं आहे.