राजमुद्रा : विधानसभा निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या असताना सर्व राजकीय पक्षातील उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.. मात्र या उमेदवारी अर्जाची मुदत संपल्यानंतर माढा मतदारसंघात वेगळाचं ट्विस्ट आला आहे.. या मतदारसंघात एकाच नावाचे चार –चार तर तीन-तीन डमी उमेदवार रिंगणात उतरला असल्याचं समोर आला आहे. या उमेदवारांमुळे अधिकृत उमेदवारांचं टेन्शन वाढणार आहे..
या मतदारसंघात (Madha Constituency) अभिजीत पाटील (Abhijeet Patil) नावाचे चार, रणजीत सिंह शिंदे (Ranjeet Shinde) नावाचे दोन उमेदवार निवडणूक लढवणार आहेत. तर करमाळ्यात तीन संजय शिंदे (Sanjay Shinde) रिंगणात उतरले आहेत. नावात साधर्म्य असलेल्या या उमेदवारांमुळे अधिकृत उमेदवारांचं टेन्शन वाढणार आहे.. एकाच नावाच्या सादरम्यामुळे मतदारांना चिन्ह लक्ष ठेवायचं की नाव लक्षात ठेवायचं याचा गोंधळ होणार आहे..
. राष्ट्रवादीकडून अभिजीत पाटील यांना तुतारी मिळाल्यानंतर अभिजीत पाटील नावाचे चार उमेदवार माढ्याच्या निवडणूक रिंगणात उतरले आहेत. तशीच परिस्थिती आमदार शिंदे यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे यांच्या बाबतही होत आहे. रणजीत सिंह शिंदे नावाचे दोन उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. करमाळा मतदारसंघातही आमदार संजय मामा शिंदे हे अपक्ष उमेदवार आहेत. त्यांच्याविरोधात त्यांच्याच नावाचे तीन उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे आता या डमी उमेदवारांचा फटका अधिकृत उमेदवारांना या निवडणुकीत बसणार का याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे..