राजमुद्रा : आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये मुख्य लढत होणार असली तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ही आपले उमेदवार रिंगणात उतरवले आहेत.. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सात वेगवेगळ्या याद्या मधून आपली उमेदवार जाहीर केले आहेत.. एकूण 138 उमेदवार मनसेचे रिंगणात आहेत.. मात्र ऐन विधानसभेच्या तोंडावर राज ठाकरेंना निवडणूक आयोगाने धक्का दिला आहे..राज ठाकरेंच्या एका सहकाऱ्याला निवडणुकीमध्ये जनतेच्या दारात जाऊन कौल मागण्याआधीच अपात्र ठरवण्यात आलं आहे. त्यामुळे यंदा मनसेकडून 137 उमेदवारच आपलं नशीब मतपेटीतून आजमावणार आहेत हे स्पष्ट झालं आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी मनसेने अकोला जिल्ह्यातील अकोला पश्चिम मतदारसंघातून प्रशंसा आंबेरे यांना संधी दिली. प्रशांत आंबेरे यांनी आपल्या उमेदवारीचा रितसर अर्ज दाखल केला. मात्र तपासणीदरम्यान प्रशांत यांचा अर्ज रद्द करम्यात आला आहे. मनसेसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. त्यामुळे या निवडणुकीत त्यांची संधी हुकली आहे..निवडणूक आयोगाच्या निकषांना पूर्ण करणारी अट नसल्याचं अर्जाच्या छाणणीदरम्यान निष्पन्न झालं आहे. नियमानुसार विधानसभेच्या निवडणुकीकरिता निवडणूक आयोगाने 25 वर्ष पूर्ण केलेल्या व्यक्तीला उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याची अट घातली आहे. मात्र अकोला पश्चिमचे मनसे उमेदवार प्रशंसा अंबेरे यांचं वय 25 वर्षांपेक्षा कमी असल्याने यांचा नामांकन अर्ज छाणनीदरम्यान बाद करण्यात आला आहे.
विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना मनसे साठी हा मोठा धक्का मानला जात आहे.. कारण अकोल्या मतदारसंघातून मनसेकडून उमेदवारी मिळालेल्या प्रशांत अंबेरेंना वयाची 25 पूर्ण करण्यासाठी अवघे 24 दिवस कमी पडले आहेत. मात्र वयाची अट ही मूलभूत अट असल्याने प्रशांत अंबेरेंना थेट अपात्र ठरवण्यात आलं आहे.