राजमुद्रा : विधानसभेची रणधुमाळी सुरू असताना पुण्यातील आठ विधानसभा मतदारसंघांपैकी कायम चर्चेत असणारा वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघ.. आता या मतदारसंघात विधानसभेच्या तोंडावर नवीन ड्रामा सुरू झाला आहे..वडगाव शेरीचे राष्ट्रवादीचे (शप) उमेदवार बापूसाहेब पठारे यांच्या सारखंच नावं असणाऱ्या व्यक्तीने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे नाव एकच आणि उमेदवार दोन असा गोंधळ या मतदारसंघात झाला आहे..
या मतदारसंघातून मूळचे श्रीगोंदा तालुक्यातील असणारे बापू बबन पठारे यांनी काल अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्या अर्जाची छाननी केल्यानंतर त्यांचा अर्ज हा वैद्य ठरवण्यात आला.. दरम्यान त्यांच्या सारखेच नाव असलेल्या एका व्यक्तीने अर्ज दाखल केल्याने बापू पठारे यांनी आक्षेप घेतला होता.. मात्र आता बापू बबन पठारे यांचा उमेदवारी अर्ज हा नियमानुसार वैध ठरवण्यात आला असल्याची माहिती वडगाव शेरीचे निवडणूक अधिकारी सचिन बावसकर यांनी दिली आहे. त्यामुळे आता वडगाव शेरी विधानसभा मतदार संघाच्या रिंगणात दोन बापू पठारे असणार आहेत.
दरम्यान गेल्या लोकसभा निवडणुकीतही राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला चिन्हामुळे आणि नावामुळे फटका बसला होता.. आता आगामी विधानसभा निवडणुकीत ही या नावाची गोंधळ असल्याने पुण्यातील वडगाव शेरी मतदारसंघात याचा फटका बसू शकतो का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.., विरोधी उमेदवाराला पराभव समोर दिसत असल्याने त्यांना अशा पद्धतीने डमी उमेदवार उभा करावा लागत असल्याची टीका सुरेंद्र पठारे यांनी केली आहे.