राजमुद्रा : आगामी विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय भूकंपाचे संकेत दिले आहेत.. विधानसभेच्या तोंडावर आमच्या महायुतीत चांगले पक्षप्रवेश होऊ शकतात तसेच काँग्रेसचे अनेक नेते आमच्या संपर्कात असल्याचा दावा त्यांनी केला आहे… नुकताच मुंबई महापालिकेत लक्षवेधी काम करणारे करणारे नेते रवी राजा यांनी काँग्रेसला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला. आज देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. निवडणूक काळात रवी राजा यांच्यावर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.
दरम्यान रवी राजा यांच्या पक्षप्रवेशानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रवी राजा यांच्यासोबत अनेक जण आमच्या पक्षात. त्यांच्याशी माझं बोलणं झालं आहे. येणाऱ्या काळात ते आमच्यासोबत येतील, असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने रवी राजा यांच्या अनुभवाचा फायदा भाजपला मिळेल. त्यांच्या माध्यमातून आमच्या संपर्कात अनेक लोक येत आहे. पुढच्या काळात काँग्रेसचे प्रमुख लोक त्यांच्या संपर्कातून भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. ही नावे आज विचारू नका. प्रवेश होईल तेव्हाच सांगेल. असा संकेतच त्यांनी दिला आहे..
दरम्यान विधानसभेसाठी महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये मुख्य लढत होणार आहे.. महाराष्ट्रात एकाच टप्प्यात मतदान होणार असून 20 नोव्हेंबरला मतदान 23 नोव्हेंबरला निकाल लागणार आहे.. या निवडणुकीवर भाष्य करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, महायुतीच सरकार येणार आहे.. कारण जनतेच्या मनात विश्वास होत आहे लोकांच्या मध्ये सकारात्मकता दिसून येत आहे.. असेही ते म्हणाले.