राजमुद्रा : विधानसभा निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या असताना वंचित बहुजन आघाडीकडून रावेर विधानसभा (raver constituency) मतदारसंघातून तृतीयपंथी शमिभा पाटील (Shamibha Patil) या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. राज्यात तृतीयपंथी घटकातून निवडणूक लढवणाऱ्या त्या एकमेव उमेदवार ठरल्या आहेत. आता या मतदारसंघातून त्यांनी बड्या नेत्यांच्या मुलांना चॅलेंज दिला आहे..काँग्रेसकडून आमदार शिरीष चौधरी यांचे पुत्र धनंजय चौधरी तर, भाजपचे दिवंगत माजी खासदार हरिभाऊ जावळे यांचे पुत्र अमोल जावळे रिंगणात आहेत.या दोघांना त्या टक्कर देणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे..
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी तृतीयपंथी घटकांना न्याय मिळावा, त्यांना त्यांचे हक्क मिळावे, यासाठी शमिभा पाटील यांना ही संधी दिली आहे. त्यामुळे आता विधानसभेचे वारे वाहू लागले असताना खान्देशात शमिभा यांच्या उमेदवारीची चर्चा रंगली आहे.
वंचितच्या अधिकृत उमेदवार शमीभा पाटील यांचा काल (बुधवारी) छानणीत त्यांचा अर्ज वैध ठरला आहे. त्यांनी प्रचारास जोरदार सुरवात केली आहे. शमिभा पाटील (वय ३९) या उच्चशिक्षित असून त्यांनी मराठी विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केली आहे. सध्या त्या कवी ग्रेस यांच्या साहित्यावर पीएच.डी करीत आहेत.वयाच्या 30 व्या वर्षी आपण तृतीयपंथी असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. आता खानदेशात वंचित बाजी मारणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे..