राजमुद्रा : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला निवडणूक आयोगाकडून दिलासा मिळाला आहे.. गेल्या लोकसभा निवडणुकीत चिन्ह ट्रंपेटच मराठी भाषांतर केल्याने शरद पवार यांच्या पक्षाला मोठा फटका बसला होता. मात्र आता आगामी विधानसभा निवडणुकीसाठी ट्रंपेट चे मराठी भाषांतर तुतारी न करता ट्रंपेटच ठेवण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने दिल्या आहेत.. त्यामुळे विधानसभेच्या तोंडावर शरद पवार गटाला मोठा दिलासा मिळाला आहे..
राज्यात सध्या विधानसभा निवडणुकांचा रणसंग्राम सुरु झाला आहे. येत्या 20 नोव्हेंबरला राज्यात विधानसभा निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. तर 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे. यंदा विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी लढत पाहायला मिळणार आहे. आता विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. लोकसभा निवडणुकीत बसलेल्या भटक्यानंतर शरद पवार गटाने निवडणूक आयोगाकडे धाव घेतली होती.. इंग्रजी वाद्य ट्रंपेट आणि मराठी मध्ये तुतारी यांच्यात फरक असल्याचे राष्ट्रवादी शरद पवार पक्षांना सांगितले होते.. त्यानंतर आता निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे.
निवडणूक आयोगाने शरद पवार पक्षाची मागणी मान्य करत चिन्ह कायमचे ठेवण्याचा निर्णय घेतला.. दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवार गट जोमाने मैदानात उतरला असून प्रचाराचा धडाका लावला आहे.. आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी हा बदल करण्यात आलेला शरद पवार यांच्या पक्षाला दिलासा मिळाला आहे..