राजमुद्रा : विधानसभा निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या असताना सर्व राजकीय पक्षांच्या उमेदवाराकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते..मात्र आता शिवसेना शिंदे गटाचे सिल्लोड विधानसभा मतदारसंघातील (Sillod Assembly Constituency) उमेदवार अब्दुल सत्तार अडचणीत यामुळे चांगलेच अडचणीत आले आहेत.. त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यात मालमत्तेची माहिती लपवल्याची तक्रार सिल्लोड येथील सामाजिक कार्यकर्ते महेश शंकरपेल्ली यांनी निवडणूक आयोगाकडे केली होती. त्यानंतर आता त्यांना 24 तासाच्या आत अहवाल पाठवण्याची निर्देश आयोगाकडून देण्यात आले आहेत.
शिवसेना शिंदे गटाकडून सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघातुन अब्दुल सत्तार यांनी निवडणूक लढवण्यासाठी दाखल केलेल्या नामनिर्देशन पत्रासोबत सादर केलेल्या शपथपत्रातील त्रुटींवर आक्षेप घेत सामाजिक कार्यकर्ता महेश शंकरपेल्ली यांनी तब्बल 16 मुद्यांद्वारे निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीची निवडणूक आयोगाने (Election Commission) या गंभीर दखल घेतली. त्यानंतर आता 24 तासांत याबाबतची माहिती देण्याचे निर्देश निवडणूक अधिकाऱ्यांनी सत्तारांना दिले आहेत. अब्दुल सत्तार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या शपथपत्रात अब्दुल सत्तार यांनी चुकीची माहिती दिल्याची तक्रार आहे. मालमत्ता, चारचाकी वाहन आणि दागिन्यांशी संबंधित खोटी माहिती दिली असल्याबाबतची तक्रार सामाजिक कार्यकर्ते महेश शंकरपेल्ली आणि डॉ. अभिषेक हरिदास यांनी निवडणूक आयोगाकडे केली होती.. आता यावर प्रशासन हे काय निर्णय घेणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागला आहे.