यावल राजमुद्रा वृत्तसेवा | शहरात भरदिवसा एक सराफ दुकानात बंदुकीचा धाक दाखवून दरोडा घालणाऱ्या चोरट्यांना सतर्क नागरिकांनी वेळीच चोप दिल्याने पुढील अनर्थ टळला. परंतु या प्रकाराने शहरात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत प्राप्त माहितीनुसार शहरात मुख्य रस्त्यावर, कोर्ट रोडवर असलेल्या बाजीराव कवडीवाले यांच्या सराफ दुकानात आज (ता. ७) दुपारी एक वाजेच्या सुमारास मोटरसायकलवरून चार जण आले. त्यांनी अचानक सराफ दुकानात प्रवेश करून मालक जगदीश कवळीवाले यांच्या गळ्याला पिस्तूल लावत बंदुकीचा धाक दाखवून ‘दुकानात काय रोकड आणि माल हे तो काढा’ असे सांगितले. दरम्यान तेवढ्यात स्थानिक व्यापाऱ्यांनी व नागरिकांनी पळापळ करून एकच गोंधळ केल्याने अज्ञात चोरटे पळून जाण्यास निघाले असता विरोध करणार्या एका व्यापारावर अज्ञात दरोडेखोरांनी गोळी झाडली. परंतु तो व्यापारी थोडक्यात बचावला.
या घटनेत दरोडेखोर मोटरसायकलवरून फरार झाले. या प्रकाराने व्यापारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले असून किती माल लुटून नेला? चोरटे कुठले कुठून आले होते? असा सवाल उपस्थित झाला आहे. मुख्य रस्त्यावर कोणकोणत्या दुकानदारांकडे सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत याची चौकशी पोलिसांनी करू या दरोडेखोरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.