राजमुद्रा : विधानसभा निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या असताना जामनेर विधानसभा मतदारसंघातील राजकारण चांगलंच रंगत चाल आहे..या मतदारसंघातून भाजप नेते गिरीश महाजन सातव्यांदा मतदारांचा कौल घेत आहेत. त्यामुळे यंदा जामनेरची निवडणूक चर्चेत आहे. तर दुसरीकडे गेल्या दोन विधानसभा निवडणुकांमध्ये उमेदवार असलेल्या संजय गरुड भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे.. तर त्यांचे रणनीती कार प्रवीण गरुड यांनी काल गोविंद बागेत बारामती येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे.त्यामुळे जळगावच्या राजकारणाला वेगळच वळण आल आहे..
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मंत्री गिरीश महाजन यांनी कोणताही दगाफटका होऊ नये यासाठी गेल्या सहा महिन्यापासून नियोजन केले होते..तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला धक्का देण्याची रणनीती त्यांनी केली होती . मात्र या रणनीतीला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानेही तेवढेच अचूक उत्तर दिले. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि भारतीय जनता पक्षाचे नेते व महाजन यांचे निकटवर्तीय दिलीप खोडपे यांनाच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने महाजन यांच्या विरोधात उतरविले आहे.त्यामुळे या मतदारसंघात अधिकच चूरसच निर्माण झाली आहे.
दरम्यान या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार मात्र गरीब विरुद्ध श्रीमंत असा आहे. त्यामुळे अनेक गावांमध्ये प्रचाराला गेल्यावर खोडपे यांना मतदार देणग्या देत आहेत. एक नोट, एक व्होट अशी प्रचाराची रणनिती त्यांनी स्विकारली आहे.त्यामुळे या मतदारसंघात जनतेचा कौल कुणाला असणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहेत..