राजमुद्रा : विधानसभा निवडणुकीच बिगुल वाजल असून इंदापूरमध्ये राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे..या मतदारसंघातून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार हर्षवर्धन पाटील रिंगणात आहेत तर अजित पवार गटाकडून दत्तात्रय भरणे यांचं तगडं आव्हान असणार आहे. यामध्ये हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी मिळालेल्या पक्षातील अनेक पदाधिकारी नाराज आहेत.या नाराजीचा फटका त्यांना निवडणुकीत बसू शकतो.. यासाठीच आता खुद्द राष्ट्रवादीची ज्येष्ठ नेते व पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार मैदानात उतरले आहेत.. आज इंदापूर मध्ये जाऊन त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते भरत शहा यांची भेट घेतली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीच्या शरद पवारांनी भरोसा यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आला आहे.. जवळपास अर्ध्या तासाच्या या भेटीत नेमकी चर्चा काय झाली तसेच वर्षा यांची नाराजी दूर करण्यात शरद पवारांना यश आले का याबाबत अजून कोणतीही माहिती समोर आलेले नाही.. दुसरीकडे प्रवीण माने यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला असून सध्या हर्षवर्धन पाटील यांना स्व पक्षातील नेत्यांच्या नाराजीचा सामना करावा लागतोय.. आता खुद्द शरद पवार मैदानात उतरले असल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला.. या पक्षप्रवेशानंतर लगेचच त्यांच्याकडून इंदापूर मधून विधानसभेच त्यांना तिकीट देण्यात आल त्यांच्यापुढे या मतदारसंघातून अजित पवार गटाची उमेदवार दत्तात्रय भरणे यांचं तगड आव्हान असणार आहे… त्यामुळे या इंदापूर मध्ये जनतेचा कौल कोणाला असणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.