राजमुद्रा : विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फेरी झडताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर आता भाजपचे आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर खळबळजनक आरोप केला आहे. या निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे पक्षाचे तिकीट विकतात असा आरोप त्यांनी केला आहे.. मातोश्री कडे ज्या बॅगा पोचवेल त्याला तिकीट मिळेल असं नितेश राणेनी म्हंटलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी बंडखोरीचा किती जरी आव आणला तरी प्रामाणिक शिवसैनिकांवर उद्धव ठाकरेंच्या मुळेच अन्याय होत आहे अशी टीका राणे यांनी केली आहे. 2005 मध्ये राणे साहेबांनी शिवसेना सोडली तेव्हा एक महत्वाचं सत्य सांगितलं होत आजही तेच सुरु आहे. , तिकिटाचं ऑक्शन आजही थांबलेलं नाही, असे ते म्हणाले.जिहादी हृदय सम्राट म्हणून उद्धव ठाकरे फिरत आहे, अशी टीका त्यांनी केली. आदित्य आणि तेजस ठाकरे यांना संजय राऊत यांच्या कडून धोका आहे असा दावाही त्यांनी केला आहे..
दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात मुख्य लढत असणार आहे.. मात्र विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीचे सरकार येणार असं नितेश राणे यांनी म्हटल आहे…परत महायुतीचे सरकार निवडून द्यायचं जनतेने ठरवलेले आहे, असा दावा त्यांनी केला आहे.