राजमुद्रा : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच बिघुल वाजल असून राज्यात 20 नोव्हेंबरला मतदान पार पडणार आहे..या निवडणुकीसाठी राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीत मुख्य सामना रंगणार आहे तर दुसरीकडे राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ही विधानसभा निवडणुकीत एकला चलोरे चा नारा दिला आहे.या पार्श्वभूमीवर असा राज ठाकरेंनी रणशिंग फुंकल असून
राज ठाकरे यांची येत्या 5 नोव्हेंबरला वणी येथे सभा होणार आहे. तर 6 तारखेला मंगळवेढा येथे सभा होणार आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर माझे ने जोरदार कंबर कसली असून पंढरपूर- मंगळवेढाचे उमेदवारी दिलीप धोत्रे यांच्यासाठी राज ठाकरे यांची ही सभा होणार आहे. वणी येथे मनसेचे उमेदवार राजू उंबरकर यांच्यासाठी ही प्रचार सभा असणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे विविध मतदारसंघांमध्ये जाहीर सभा घेत आहेत.. महाराष्ट्रातील पहिली सभा ही कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात होणार आहे.. त्यामुळे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागला आहे.
दरम्यान यापूर्वी राज ठाकरे यांनी मनसेच्या मेळाव्यात भाषण करताना आपण विधानसभेला 225 ते 250 जागा लढविणार असल्याच म्हटलं होतं मात्र प्रत्यक्षात तसं काही झालं नाही.. राज ठाकरे विधानसभेमध्ये सर्वात जास्त उमेदवार उभे करील असे म्हटले जात होते. परंतू प्रत्यक्षात तसे झालेले नाही. विधानसभेसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या 29 ऑक्टोबर या तारखेपर्यंत मनसेचे 135 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणार उतरवले आहेत. तरी देखील भाजपाच्यानंतर मनसेचे सर्वाधिक उमेदवार आहेत. दरम्यान आता या जाहीर सभेतून मराठवाड्यात राज ठाकरेंची तोफ धडाडणार आहे..