राजमुद्रा : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून निवडणुकीसाठी महायुतीने जोरदार कंबर बसली आहे तर दुसरीकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे गट ही जोमाने मैदानात उतरला आहे.. शिवसेना पक्षातील बंडानंतर या निवडणुकीत तब्बल 49 विधानसभा मतदारसंघात ठाकरे यांची शिवसेना विरुद्ध शिंदे यांची शिवसेना असा सामना होणार आहे.. त्यामुळे खरी शिवसेना कोणाची असणार? तसेच मतदारांच्या नजरेतील बाळासाहेबांचा खरा वारसदार कोण हे येत्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर समजणार आहे..
आगामी विधानसभा निवडणुकीत शिंदे आणि ठाकरे यांच्यामध्ये पूर्वीच्या शिवसेनेचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या मुंबई महानगर प्रदेशात १९ जागांवर आणि एकट्या मुंबईत १२ ठिकाणी थेट सामना होणार आहे. मराठवाडा आणि कोकणात आठ, विदर्भात सहा, उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रात प्रत्येकी चार जागांवर शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत होणार आहे.. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
विधानसभा निवडणुकीत महायुतीचा विजय होणार असे वारंवार बोलली जात आहे.. दरम्यान याआधी शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे ४० आमदारांसह बाहेर पडले होते. त्यामुळे किमान तेवढे तरी आमदार परत निवडून आणण्याचे आव्हान शिंदे यांच्यासमोर आहे. जर ४० आमदार निवडून आणले, तर शिंदे यांची मुख्यमंत्रिपदाची खुर्ची कायम राहील, असे आश्वासन भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने दिले असल्याचे बोलले जाते. त्यामुळे आता आगामी विधानसभेच्या निकालानंतरच खरी शिवसेना कोणाची असणार हे स्पष्ट दिसणार आहे..