राजमुद्रा : राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून या निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा आज अखेरचा दिवस आहे..अवघी काही मिनिटं बाकी आहेत. असं असताना कोण अर्ज मागे घेणार आणि कोण लढण्यावर ठाम आहे, याची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. अशातच आता नाशिकच्या देवळाली मतदारसंघातून माजी मंत्री बबनराव घोलप यांच्या कन्या तनुजा घोलप यांनी माघार घेतली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा ला उधाण आहे.
या मतदारसंघात गटाकडून तनुजा घोलप यांचे बंधू योगेश घोलप निवडणुकीच्या रिंगणात आहेत.. मात्र याआधी तनुजा यांनी या निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवारी दाखल केल्याने कौटुंबिक कलहाचा देखील सामना करावा लागला होता. त्यांनी या मतदारसंघातून भावाविरुद्ध उमेदवारी अर्ज दाखल केला होता.. अखेर अर्ज माघार घेताना तनुजा घोलप भावूक झाल्या.. भावाला निवडणुकीसाठी बहीण म्हणून शुभेच्छा मात्र महायुतीतच राहून महायुतीचा काम करणार आहेत. तनुजा घोलप यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केल्यानंतर बबनराव घोलप यांनी नाव न वापरण्याची नोटीस धाडली होती. आता मात्र या मतदारसंघातून त्यांनी माघार घेतली आहे..
विशेष म्हणजे त्यांचे वडील माजी मंत्री बबनराव घोलप यांनी थेट कायदेशीरच नोटीस पाठवली होती.. तुमचं लग्न झालेलं असल्याने तुम्ही माझ नाव लावू नाही शकत..तुम्ही सासरचे नाव लावावे असे आशयाची नोटीस बघून घोलप यांनी त्यांच्या मुलीला बजावली होती.. या निवडणुकीच्या रिंगणात त्यांना कौटुंबिक कलहाचा सामना अधिक करावा लागला..
तर दुसरीकडे जळगावच्या एरंडोल मतदार संघातून शिवसेना ठाकरे गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य नानाभाऊ महाजन यांची माघार आहेत. एरंडोल मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाकडून नानाभाऊ महाजन यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता.. अगदी काहीतरी शिल्लक असताना आता त्यांनी या निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली आहे..