राजमुद्रा : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून काल अर्ज करणाऱ्या उमेदवारांच्या माघारीचा शेवटचा दिवस होता. या शेवटच्या दिवशी जळगाव जिल्ह्यातील रावेर विधानसभा मतदारसंघातून 14 जणांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे आता निवडणुकीच्या रिंगणात 9 उमेदवार असणार आहेत. तरी खरी लढत ही भाजपा, काँग्रेस, प्रहार जशक्ती आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात होणार असून चौरंगी लढत राहणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
महाराष्ट्रात विधानसभा निवडणूकिमध्ये महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यामध्ये मुख्य लढत होणार असून 20 नोव्हेंबरला मतदान पार पडणार आहे.. तर 23 नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल लागणार आहे.. दरम्यान रावेर विधानसभा मतदारसंघातून ९ उमेदवार रिंगणात आहे. यात अमोल हरीभाऊ जावळे (भाजपा), धनंजय शिरीष चौधरी (काँग्रेस), नारायण हिरामण अडकमोल (बसपा), अनील छबिलदास चौधरी (प्रहार जनशक्ति पार्टी), आरिफ खालिक शेख ( ऑल इंडिया मजलिस पार्टी), खल्लोबाई युनूस तडवी (ऑल इंडिया हिंदुस्तान काँग्रेस पार्टी) मुस्ताक कमाल मुल्ला (आजाद समाज पार्टी), शमिभा भानुदास पाटील (वंचित बहुजन आघाडी), दारा मोहंमद जफर मोहंमद (अपक्ष) यांचा समावेश आहे.. त्यामुळे या मतदारसंघात कोण बाजी मारणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागला आहे..
रावेर विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या दिवशी सुरेश गुलाब बोदडे, उमा विठ्ठल भिल, संजय अर्जुन चौधरी, नुरा तडवी, धीरज अनिल चौधरी, नंदिनी अनिल चौधरी, अबाज फकिरा तडवी, वामनराव भालचंद्र जडे, गंगाराम महेंद्र बान्हे, दिवाकर वाणी, शोहिखान मुस्तफा तडवी, शेख कुर्बान शेख करीम, संजय हमीद तडवी, हर्षा अनिल चौधरी यांनी माघार घेतली आहे.