राजमुद्रा : जळगाव शहरातील तांबापुर परिसरातील इच्छा देवी चौक परिसरामध्ये गॅस सिलेंडर फुटल्याने खळबळ उडाली आहे.जळगाव मध्ये अनाधिकरित्या गॅस सिलेंडर भरण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे..सार्वजनिक स्थळांवर अतिक्रमण करून उघडपणे हा व्यवसाय करण्यात येत आहे..मात्र याकडे पोलिसांचे साफ दुर्लक्ष होत आहे.. गॅस सिलेंडर फुटल्याने चार जण जखमी असल्याची माहिती समोर आली आहे..अग्निशमन दलाचा पथक बचाव कार्यासाठी पोहोचले असून आग विझवण्याचा प्रयत्न युद्ध पातळीवर सुरू आहे.
जखमी झालेल्या एकूण चार जणांना वैद्यकीय उपचारासाठी जळगाव जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आले आहे..मात्र आगच प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्याकारणाने अग्निशमन दलाचे प्रयत्न सुरू आहे.या स्फोटामुळे बघणाऱ्यांची गर्दी देखील मोठ्या प्रमाणात आहे..तसेच अनेक जण बचाव कार्यास मदत करीत आहे. स्पोर्ट झालेल्या काही अंतरावरच तांबापुराची वस्ती आहे, तसेच हॉस्पिटल देखील आहेत मात्र सुरू असलेल्या अनाधिकृत व्यवसायाला अधिकृत चालना देण्यात आली की काय ? अशा विविध चर्चा घडण्यास स्थळावर रंगत आहे..
दरम्यान गॅस सिलेंडरच्या विषम स्पोर्ट इतका मोठा होता की संपूर्ण राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा आधीच्या भडक्याने व्यापला गेला यामुळे संपूर्ण वाहतूक देखील ठप्प झाली आहे..एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या तसेच इतर भागात मोठ्या प्रमाणावर अनाधिकृत व्यवसायांना चालना देण्यात येत आहे.. यामध्ये पोलीस दलातील काही म्होरक्यांचा देखील समावेश आहे मात्र याकडे जिल्ह्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाल्याचे या घटनेनिमित्त पाहायला मिळत आहे..