राजमुद्रा : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना शिवसेना शिंदे गटाने बंडखोर नेत्यावर कारवाई करायला सुरुवात केली आहे.. अशातच आता माहीम विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण चांगलंच तापणार आहे. या मतदारसंघात महायुतीच्या शिवसेना शिंदे गटाकडून सदा सरवणकर यांना राजपुत्र अमित ठाकरे यांच्या विरोधात उमेदवारी देण्यात आली आहे.. नुकतीच कल्याण विधानसभेत अपक्ष उमेदवारी अर्ज भरणाऱ्या महेश गायकवाड यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.. त्यामुळे आता सदा सरवणकर यांच्यावर देखील मुख्यमंत्री शिंदे कारवाई करणार का? अशा चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आला आहे.
विधानसभा निवडणुका तोंडावर मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी वारंवार भेटीसाठी होत होत्या.. मात्र आता त्यांचा अचानक ट्रॅक बदलून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या निशाणावर आले आहेत.. याचं कारण म्हणजे माहीम ची जागा..या माहीमच्या जागेवरून राजकारण चांगलंच रंगत चालला आहे.. या मतदार संघात यंदा तिरंगी लढत होणार आहे. शिवसेना शिंदे गटाकडून सदा सरवणकर निवडणूक लढत आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे महशे सावंत आणि मनसेचे उमेदवार अमित राज ठाकरे यांच्यात लढत होत आहे. अमित ठाकरे यांच्या साठी सदा सरवणकर यांनी माघार घ्यावी, यासाठी प्रयत्न झाले. पण त्यांनी माघार घेतली नाही. त्यामुळे सरवणकरांवर कारवाई होणार का? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागला आहे..
विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्या तब्बल 40 जणांवर भाजपने कारवाई करत त्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे.. आता तशीच कारवाई मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेचे उमेदवार सरवणकर यांच्यावरही करणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे