राजमुद्रा : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असताना सर्व राजकीय पक्षाकडून प्रचाराचा धुरळा उडवला जात आहे.. अशातच आता राष्ट्रवादी अजित पवार गटाने त्यांचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. यावेळी त्यांनी बारामतीकरांना खास आश्वासने दिली.यामध्ये बारामतीकरांसाठी जागतिक दर्जाचे क्रीडा अकादमी सुरू करणार असल्याचा आश्वासन अजित पवार यांनी दिले. या अकादमीमध्ये बॉक्सिग, कुस्ती, भालाफेक, शुटींग, पोहणे इत्यादी प्रकारचे खेळ शिकवून खेळाडू तयार केले जातील. तसेच यामध्ये आधुनिक सुविधा, वैधानिक कोचिंग आणि प्रशिक्षण महाराष्ट्रातील खेळाडूंना दिले जाईल, असेही ते म्हणाले..
अजित दादांनी बारामती मतदारसंघासाठी जाहीरनामात केलेला घोषणा
बारामतीतील शेतकऱ्यांसाठी पाच हजार कृषी अधारित फूड प्रोसेसिंग युनिटचे एक नेटवर्क करणार
स्थानिकांना रोजगार मिळवण्यासाठी एक लॉजेस्टिक पार्क उभारण्यात येईल
बारामतीत जागतिक क्रीडा अकादमी सुरू करणार.
पंजाब आणि हरियाणातून प्रेरणा घेऊन अकादमी सुरू करणार आहे. बॉक्सिंग आणि भालाफेक शिकवलं जाईल.
बारामतीला पहिलं सौर ऊर्जा असलेलं शहर बनवणार
कॅन्सरसाठी कर्करोग रुग्णालय उभारणार
दरम्यान अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या बारामती मतदारसंघात राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून अजित पवार तर शरद पवार गटाकडून त्यांची पुतणे युगेंद्र पवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.. या मतदारसंघात कोण बाजी मारणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागल आहे.दरम्यान अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून जाहीर झालेल्या जाहीरनाम्यात आम्ही ५० मतदारसंघासाठी ५० जाहीरनामे जाहीर करणार आहोत. बाकीचे जाहीरनामे जाहीर करणार आहोत. एक पुस्तिकाही आम्ही प्रकाशित करत आहोत असेही त्यांनी म्हटले आहे..