राजमुद्रा : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे.. सर्व राजकीय पक्षांकडून मतदारसंघांनी प्रचाराचा धुरळा उडवला जात असतानाच आता मालवण कुडाळ विधानसभा मतदारसंघाचे शिंदे शिवसेनेचे उमेदवार निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.. बाळासाहेब ठाकरे यांचं नाव नाव मागे नसतो तर.. उद्धव ठाकरे कोण हे नकाशावर शोधून सुद्धा सापडले नसते. असा घणाघात राणे यांनी केला आहे..
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गट ही जोमाने प्रचारास मैदानात उतरला आहे.. नुकत्याच झालेल्या सभेत शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी घराणे शाही वरून राणी कुटुंबीयांवर हल्लाबोल चढवला होता.. यावर आता प्रतीउत्तर निलेश राणे यांनी दिला असून उद्धव ठाकरे यांना आमच्या घराण्याच्या वर बोलण्याचा काहीही अधिकार नाही..कारण एका शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवतो असं सांगून ते स्वतः मुख्यमंत्री झाले. जर बाळासाहेब ठाकरे यांचं नाव मागे नसतं, तर उद्धव ठाकरे कोण हे नकाशावर शोधून सुद्धा सापडले नसते”, अशा शब्दात निलेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.
ज्यावेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्यांनी या कोकणासाठी काय दिलं.. जे उद्धव ठाकरे महाराष्ट्रासाठी काही देऊ शकले नाही ते कोकणासाठी काय देणार अशा शब्दात रानेणी ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.उद्धवठाकरेंची भाषणही आता रटाळ वाटू लागले आहेत .त्यामुळे त्यांच्या दौऱ्याकडे आम्ही लक्ष देत नाही. ते शिव्या घालण्यापलीकडे काहीही बोलत नाही. त्यामुळे त्यांच्याकडे आम्ही आता दुर्लक्षच करतोय.. या विधानसभा निवडणुकीसाठी आम्ही कतृत्वावर आमच्या कामावर मत मागतो. असंही त्यांनी स्पष्ट सांगितलं.