राजमुद्रा : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा फैजपूर दौऱ्यावर येत आहेत.. रावेरी यावल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार अमोल हरिभाऊ जावळे यांच्या प्रचारासाठी त्यांची फैजपूर येथे सभा होणार असल्याची माहिती समोर आली आहे.. त्यासंदर्भात रात्री उशिरापर्यंत नियोजन सुरू होते.. मिळालेल्या माहितीनुसार अमित शहा यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, गिरीश महाजन यांच्यासह भाजप तसेच महायुतीतील वरिष्ठ नेत्यांची ही उपस्थिती असणार आहे..
रावेर यावल विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार अमोल भाऊ हरिभाऊ जावळे यांच्या प्रचारासाठी सभांचा धडाका लावला जाणार आहे.. यासंदर्भात गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत सभेबाबत आज भारतीय जनता पक्षाच्या वतीने अधिकृत घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.. दरम्यान गेल्या लोकसभा निवडणुकीत मंत्री अमिषा यांनी जळगाव येथील स्मिताताई वाघ यांच्या साठी सभा घेतली होती.. त्यानंतर आता विधानसभेच्या निवडणुकीसाठी रिंगणात असलेले महायुतीचे उमेदवार अमोल हरिभाऊ जावळे यांच्यासाठी ते सभा घेणार आहेत..