मुंबई राजमुद्रा वृत्तसेवा | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना ईडीनं समन्स बजावलं असून उद्या (ता ८) गुरुवार सकाळी ११ वाजेपर्यंत ईडीच्या कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देनुत्त आले आहेत. ईडीने खडसे यांचे जावई गिरीष चौधरी यांना काल रात्री अटक करण्यात आले असून विशेष पीएमएलए कोर्टातर्फे त्यांना १२ जुलैपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे.
खडसेंचे जावई गिरीष चौधरी यांच्यावर पुणे जिल्ह्यातील भोसरी येथील जमीन खरेदी प्रकरणी चौकशीसाठी बोलावून ईडीने त्यांना अटक केल्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर आता ईडीनं खुद्द एकनाथ खडसे यांना चौकशीसाठी पाचारण केलं आहे. त्यामुळे पुन्हा चर्चेला उधाणं आलं आहे.
एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदा खडसे, जावई गिरीश चौधरी यांच्या नावाने भोसरी येथे एमआयडीसीमध्ये जागा खरेदी केल्याचं प्रकरण फडणवीस सरकारच्या काळात चागलंच गाजलं होतं. खडसेंनी मंत्रीपदाचा गैरवापर करून कमी किंमतीत ही जागा खरेदी केल्याचा आरोप त्यांच्यावर होता. याप्रकरणी चौकशीसाठी समिती नेमण्यात आली होती.
मंत्रिपदावर असताना त्यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचा गंभीर आरोप झाल्याने त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागत होता. यानंतर खडसेंची ईडीकडून चौकशी सुरू सुरू झाली होती. मध्यंतरी खडसेंनी फडवणीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशावेळी त्यांनी ईडी लावली तर आम्ही सीडी लावू असं जाहीर कार्यक्रमात म्हटलं होतं.