राजमुद्रा : विधानसभा निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या असताना सर्व राजकीय पक्षातील उमेदवारांनी प्रचारासाठी जोर लावला आहे.. या दरम्यान आता राष्ट्रवादी पक्षाचे नेते शरद पवार हे देखील दंड थोपटून मैदानात उतरले आहेत.. या विधानसभेसाठी त्यांच्या प्रचाराचा झंजावत उपमुख्यमंत्री अजित दादांना चांगला जड जाणार असल्याच दिसून येत आहे..शरद पवार पुढच्या 10 दिवसांत तब्बल 36 सभा घेणार आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या शेवटच्या सभेचं ठिकाणही विशेष असणार आहे. त्यांची शेवटची सभा ही बारामतीत असणार असून त्यामुळे अजित पवार यांचा टेन्शन वाढणार आहे.
या बारामती मतदारसंघात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे युगेंद्र पवार आणि खुद्द अजित पवार यांच्यात लढत होणार आहे.. त्यामुळे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटासाठी ही निवडणूक महत्त्वाची असणार आहे..
आगामी काळात शरद पवार पूर्ण ताकदीने प्रचार करणार आहेत. ते पुढच्या दहा दिवसांत म्हणजेच 18 नोव्हेंबरपर्यंत तब्बल 36 सभांना संबोधित करणार आहेत. यामध्ये उत्तर कराड, तासगाव कवठे महांकाळ, इंदापूर, कर्जत जामखेड अशा महत्त्वाच्या मतदारसंघांचा समावेश असणार आहे. या सभांच्या माध्यमातून ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहेत.
6 नोव्हेंबर ते 18 नोव्हेंबरपर्यंत शरद पवारांच्या एकूण 50 सभांचे आयोजन होणार आहे.
शरद पवार आज (नोव्हेंबर) उदगीर, परळी, आष्टी आणि बीड विधानसभेसाठी सभा घेणार आहेत.
10 ऑक्टोबर- परंडा, शेवगाव, गंगापूर, घनसावंगी
11 ऑक्टोबर- एरंडोल, सिंदखेडा, जामनेर, मुक्ताईनगर, जळगाव ग्रामीण
12 ऑक्टोबर- कळवण, दिंडोरी, निफाड, सिन्नर, येवला, कोपरगाव
13 ऑक्टोबर- रहाता, श्रीवर्धन, जुन्नर, आंबेगाव, राजगुरुनगर, भोसरी
14 ऑक्टोबर- चिंचवड/पिंपरी रॅली
15 ऑक्टोबर- तासगाव कवठे महाकाळ, चंदगड, कराड उत्तर
16 ऑक्टोबर- वाई, कोरेगाव, माण, फलटण
17 ऑक्टोबर- करमाळा, माढा, कर्जत जामखेड
18 ऑक्टोबर- भोर, दौंड, इंदापूर, बारामती