राजमुद्रा : विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार चांगलेच अडचणीत आले आहेत.. पुणे येथील फोर्स कार अपघात प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांना नोटीस पाठवली आहे, असा गौप्यस्फोट खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे.. सुप्रिया सुळे यांनी पुणे येथील वडगाव शेरीत आयोजित सभेत हा गौप्यस्फोट केला आहे.
वडगाव शेरीत झालेल्या सभेत बोलताना सुप्रिया सुळे यांनी केलेल्या गौप्यस्फोटांना खळबळ उडाली आहे.. याबाबत बोलताना त्या म्हणाल्या,,सुनील टिंगरे यांनी पाठवलेली नोटीस मी स्वतः नोटीस पाहिली नाही. मंचावर एका व्यक्तीने ती बघितली आहे. सुनील टिंगरे यांनी धमकी दिली आहे की जर तुम्ही पोर्श केसमध्ये माझी बदनामी केली तर तुम्हाला कोर्टात खेचू. आता ही नोटीस मी बघणार आहे, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.या प्रकरणामुळे शरद पवार यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याचे दिसून येत आहे..
दरम्यान विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून युगेंद्र पवार तर त्यांच्या विरोधात खुद्द अजित पवार मैदानात आहेत.. त्यामुळे बारामतीकडे संपूर्ण महाराष्ट्रासह देशाचे लक्ष लागला आहे.. आता या मतदारसंघात बाजी कोण मारणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.