राजमुद्रा : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काही दिवस शिल्लक राहिले असताना राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांची भेट घेतली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल आहे.
आंबेगाव-शिरुर विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत पाहायला मिळणार आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून विद्यमान आमदार दिलीप वळसे-पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर शरद पवार गटाकडून देवदत्त निकम यांना उमेदवारी मिळाली आहे. . त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीत आंबेगाव विधानसभा मतदारसंघात कुणाचा झेंडा फडकणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे..
दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आंबेगाव विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची उमेदवार देवदत्त निकम यांच्या प्रचारासाठी जयंत पाटील आले होते.. यानंतर त्यांच्याशी फोनवरून शिवाजीराव आढळराव पाटील यांचं बोलणं झाल्यानंतर त्यांनी भेटण्याची इच्छा व्यक्त केली.. तेव्हा त्यांना भेटण्यासाठी होकार दिला..मात्र मीडियाने लगेचच आढळराव आणि जयंत पाटील यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली. त्यांचा अजेंडा काय, असे एक ना अनेक प्रश्न विचारले. यामुळे उलटसुलट राजकीय चर्चा रंगल्या. आता या भेटीत नेमकी काय चर्चा झाली याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागला आहे..