राजमुद्रा : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असताना सर्व राजकीय पक्षांनी प्रचाराचा धुरळा उडवला आहे.. अनेक नेते या प्रचारसभातून आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत.. या पार्श्वभूमीवरच आता भाजप ॲक्शन मोडवर आला असून राहुल गांधींनी प्रचार सभेत खोटे बोलून बदनामी केल्याची तक्रार भाजपने आता निवडणूक आयोगाकडे केली आहे.. निवडणूक रॅलीमध्ये राहुल गांधी भाजपवर बिनबुडाचे आरोप करत आहेत. असे त्यांनी म्हटले आहे.. त्यामुळे विधानसभेच्या तोंडावर राहुल गांधी यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याचे दिसून येत आहे..
दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी सहा नोव्हेंबर रोजी नागपूर झालेल्या प्रचारात खोटे बोलले व तसेच बिन बुडाचे आरोप भाजपवर केले.. भाजप संविधान नष्ट करणार असल्याचे त्यांच्याकडून वारंवार बोलले जाते.. त्यांचं हे विधान पूर्णपणे चुकीचा आहे, असे भाजपच्या शिष्टमंडळाने मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांची भेट घेतली आणि त्यांना सांगितले.त्यामुळे राहुल गांधी यांच्या विरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 353 अंतर्गत ‘एफआयआर’ नोंदवण्यात यावी, अशी मागणी भाजपने केली आहे.
दरम्यान महाराष्ट्र विधानसभा निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपले असताना येत्या 20 नोव्हेंबरला राज्यात मतदान होणार असून 23 नोव्हेंबरला निकाल लागणार आहे.. या निवडणुकीसाठीचा प्रचार हा शिगेला पोचला असून राज्यभरात प्रचार सभा प्रचार पेऱ्यांची रणधुमाळी सुरू झाले आहे.. अशातच आता भाजपने निवडणूक आयोगाकडे केलेल्या तक्रारीने राहुल गांधी यांच्या अडचणीत वाढ होणार आहे…