राजमुद्रा : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असताना युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी केलेल्या दाव्याने खळबळ उडाली आहे..शिवसेना शिंदे गटातील एक मंत्री आणि 8 आमदार परत शिवसेना ठाकरे गटात येण्याचा दावा आदित्य ठाकरे यांनी केला आहे..हा मंत्री नेमका कोण? आणि त्यांच्यासोबत परत ठाकरे गटात येणारे 8 आमदार कोणते असणार याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे..
विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारांचे अर्ज भरतेवेळी शिंदे गटातील नेत्यांचा फोन आला असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.. त्यामुळे आगामी विधानसभानंतर मोठा राजकीय भूकंप येणार असल्याच त्यांनी म्हटलं आहे.. दरम्यान आदित्य ठाकरे यांनी शिवसेना शिंदे गटावर जोरदार टीका केली. आणि जण बंडखोरी करून आमचाच पक्ष आणि चिन्ह चोरतात…अनेक जण पक्ष बदलतात, विचारधारा बदलतात, पण यांनी पक्ष फोडला, पक्षाचं नाव आणि चिन्हही चोरल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. तसेच ते आजही माझ्या आजोबांचे फोटो वापरतात, तेही माझ्याच बाबांनी काढलेले, असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी जोरदार टीका केली. दरम्यान आता विधानसभेच्या रणधुमाळीत. एका मंत्र्यासह 8 आमदार परत ठाकरे गटात येणार असल्याचं वक्तव्याची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होत आहे.
विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराचा धुरळा उडवला आहे. राजकीय नेते ऐकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. दरम्यान महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला मतदान होणार असून 23 नोव्हेंबरला निकाल लागणार आहे..