मुंबई राजमुद्रा वृत्तसेवा | राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री एकनाथराव खडसे हे ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी नुकतेच दाखल झाल्याचे सूत्रांनी सांगितले, दरम्यान या अधिकाऱ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची माहिती व उत्तरे त्यांच्याकडून मिळणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
ईडीने आता पुन्हा एकनाथराव खडसे यांची चौकशी सुरू केल्याने त्यांना राजकीय ग्रहण लागण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या चौकशीतून पुढे काय निष्पन्न होते? त्यांच्यावर कोणती कारवाई होते? याकडे राजकीय लोकांचे लक्ष लागून आहे. एकनाथराव खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अटक केल्यानंतर त्यांची रवानगी कोठडीत करण्यात आली आहे.
खडसे आणि त्यांच्या सौभाग्यवती मंदा खडसे यांच्यावरही कारवाईची टांगती तलवार आहे. या अनुषंगाने एकनाथराव खडसे ८ जुलै रोजी सकाळी ११ वाजता ईडीच्या मुंबई येथील कार्यालयात चौकशीसाठी गेले होते. दरम्यान आता त्यांची चौकशी सुरू झाली आहे. खडसे ईडीच्या कार्यालयात जाण्याआधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषद घेणार असल्याचे पक्षाने जाहीर केले होते. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने एका ट्विटच्या माध्यमातून खडसे यांची प्रकृती बिघडल्यामुळे आजची पत्रकार परिषद रद्द करण्यात येणार असल्याची माहिती दिली. त्यामुळे ही पत्रकार परिषद रद्द झाली आहे. याच्या मागील ‘खरे कारण काय?’ हे याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.