राजमुद्रा : आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये मुख्य लढत असली तरी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेली परिवर्तन महाशक्ती आघाडीही जोमाने मैदानात उतरली आहे.. या पार्श्वभूमीवर या तिसऱ्या आघाडीचे रावेर-यावल विधानसभा मतदारसंघातील परिवर्तन महाशक्ती प्रहार जनशक्ती पक्षाचे अधिकृत उमेदवार अनिल छबिलदास चौधरी यांच्या प्रचाराचा जोरदार धडका ग्रामीण भागात सुरू आहे. त्यांच्या प्रचारार्थ प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख माजी मंत्री आ.बच्चू कडू आज रावेर, फैजपूर मैदानात तोफ धडाडणार आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परिवर्तन महाशक्तीच्या माध्यमातून आ.बच्चू कडू हे तिसऱ्या आघाडीत सहभागी झाले असून त्यामुळे ते महायुती आणि महाविकास आघाडीवर जोरदार प्रहार करण्याच्या अंदाज आहे. आज ते रावेर आणि फैजपूर मतदारसंघातून कोणावर रोख ठेवणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागला आहे..
आपल्या रोखठोक भाषणाने दिग्गजांना घाम फोडणारे, अधिवेशनात थेट टीका करणारे बच्चू कडू आज कुणाला लक्ष्य करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. यावल, फैजपूर, रावेर तालुक्यात मतदारांचा जोरदार प्रतिसाद लाभत असून अनिल चौधरींचा विजय निश्चित असल्याचे म्हटले जात आहे.
रावेली यावल मतदार संघात आ.बच्चू कडू यांचे दुपारी हेलिकॉप्टरने आगमन होणार आहे. दुपारी ४ वाजता छोरिया मार्केट, बुऱ्हाणपूर रोड, रावेर येथे सभेला ते संबोधित करणार असून सायंकाळी ७ वाजता आठवडे बाजार, मरीमाता मंदीराजवळ, फैजपूर येथील सभेला ते संबोधित करणार आहेत. मतदार संघातील नागरिक आणि प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या सभेला मोठ्याप्रमाणात उपस्थिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. आता या सभेकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिला आहे