राजमुद्रा : महाराष्ट्र विधानसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या असताना उत्तर महाराष्ट्रातील जनता कौल कोणाला देणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलं आहे..या उत्तर महाराष्ट्रात नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि नगर या जिल्ह्यांचा समावेश आहे..यात एकूण ४७ विधानसभा मतदारसंघ आहेत. या निवडणुकीत उत्तर महाराष्ट्रातून कोण बाजी मारणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. या प्रत्येक मतदारसंघात महायुती की महाविकास आघाडीचे वर्चस्व राहणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार उत्तर महाराष्ट्रात महाविकास आघाडीच सरकार असण्याची शक्यता वर्तवली जात आहे..
उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे एरंडोल मतदारसंघातून अण्णासाहेब सतीश पाटील, जळगाव ग्रामीण गुलाबराव देवकर, जामनेर दिलीप बळीराम खोडपे तर मुक्ताईनगर अॅड खडसे रोहिणी एकनाथराव हे मैदानात आहेत..दरम्यान महाराष्ट्रात येत्या 20 नोव्हेंबरला मतदान होणार असून 23 नोव्हेंबरला मतदानाचा निकाल लागणार आहे.. तर धुळे शहर विधानसभा मतदारसंघातून भाजप महायुतीचे उमेदवार अनुप अग्रवाल विधानसभेच्या रिंगणात आहेत.. तर महाविकास आघाडी कडून धुळे शहराचे माजी आमदार अनिल गोटे निवडणुकिच्या रिंगणात आहेत..दरम्यान नंदुरबारमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्ता तथा माजी खासदार डॉ. हीना गावित यांनी भाजपला रामराम केला. अक्कलकुवा मतदारसंघात बंडखोरी करत गावित यांनी अपक्ष उमेदवाराचा अर्ज भरला होता. त्यादरम्यान, हीना गावित यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिलेली आहे. अक्कलकुवा विधानसभेसाठी शिंदे शिवसेनाकडून विधान परिषदेचे आमदार आमश्या पाडवी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पण गावित यांनी या मतदारसंघात आपली भूमिका मांडत पक्षाला राजीनाम दिला याचीही पडसाद उत्तर महाराष्ट्रातील मतदारसंघात दिसून येणार आहेत..
दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जळगाव जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघात बाजी कोण मारणार याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागला आहे..