राजमुद्रा : विधानसभा निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या असताना संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिल आहे ते धुळे शहर विधानसभा मतदारसंघाकडे.. धुळे शहरात भाजपाचे अनुप अग्रवाल, शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे माजी आ. अनिल गोटे आणि आणि एमआयएमचे आ. फारूक शाह तसेच समाजवादी पार्टीचे इर्शादभाई जहागिरदार रिंगणात असल्याने याठिकाणी भाजपा, शिवसेना उध्दव ठाकरे गट, एमआयएम आणि समाजवादी पार्टी अशी चौरंगी लढत पहायला मिळत आहे..दरम्यान या मतदारसंघात विधानसभेचे तीन वेळा अनिल गोटेनी प्रतिनिधित्व केलं आहे. आता या मतदारसंघाचा गड कोण राखणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलं आहे.
एकेकाळी धुळे जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. त्यानंतर भाजपने (BJP) हा जिल्हा काबीज केला. तर 2019 सालच्या निवडणुकीत एमआयएम (MIM) पक्षाने धुळ्यात आपले पाय रोवले. धुळ्यात एकूण पाच मतदारसंघात समावेश होतो. त्यात काँग्रेस, भाजप, अपक्ष आणि एमआयएम या सर्वच पक्षांचा वरचष्मा पाहायला मिळतो. दरम्यान याआधी 2019 मध्ये, हा मतदारसंघ ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनने जिंकला होता. ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे शाह फारुक अन्वर यांनी 3307 मतांच्या फरकाने अपक्ष राजवर्धन रघुजीराव कदमबांडे (राजुबाबा) यांचा पराभव करून जागा जिंकली. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत धुळे लोकसभा मतदारसंघातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या उमेदवार शोभा दिनेश बच्छाव यांनी भारतीय जनता पक्षाच्या डॉ. सुभाष रामराव भामरे यांचा 3831 मतांच्या फरकाने पराभव केला होता.. आता या विधानसभेच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.. दरम्यान याआधीची .धुळ्याची वादग्रस्त पार्श्वभूमी अशी की अनेक जातीय तणावग्रस्त दंगली 2008 आणि 2013 मध्ये झालेली दंगल ही मोठ्या प्रमाणात वादग्रस्त ठरली.. त्यानंतर धुळ्याचा राजकारण ढवळून निघाले..
धुळे शहर मतदारसंघाचा गेल्या दोन दशकांचा इतिहास पाहता हा मतदारसंघ 1999 सालापासून आलटून-पालटून अनिल गोटे आणि राजवर्धन कमदबांडे यांच्याकडेच राहिला आहे. 1995 आणि 2004 अशा दोनवेळा राजवर्धन कदमबांडे तर 1999, 2009 आणि 2014 अशा तीनवेळा अनिल गोटे इथून विजयी झाले आहेत.गेली दोन दशकं आलटून-पालटून धुळे शहराचं विधानसभेत प्रतिनिधित्व करणाऱ्या अनिल गोटे आणि राजवर्धन कदमबांडे यांना बाजूला सारत इथल्या जनतेनं एमआयएमचे फारूक शाह यांना निवडलं..फारुख शहा काही दिवसापासून राष्ट्रवादीमध्ये सक्रिय होते. त्यानंतर ते एमआयएमच्या वाटेवर गेल्यानंतर 2019 मध्ये मतांच ध्रुवीकरण झालं .. मात्र ते भाजपमध्येहीं सक्रिय असल्याने त्यांनी भाजपच्या राजकीय गणिताची जाण होती..त्यामुळे या मतदारसंघात भारतीय जनता पार्टी कडून एमआयएमला या ताकद देण्यात येणार असल्याचहीं बोललं जात आहे.. दरम्यान तुम्ही महापालिकेत जमायचे सहा नगरसेवक निवडून आले होते..त्यामुळे एमआयएमच्या विजयाला पार्श्वभूमी ही होतीच..
राज्यांच्या नेतृत्वावर वारंवार केलेल्या टीकेमुळे तसेच वादग्रस्त विधानामुळे अनिल गोटे नेहमीच चर्चेत राहिले आहेत.. मात्र आगामी विधानसभा निवडणुकीत जनतेचा असणारा त्यांना पाठिंबा राजकीय गणितं बदलू शकणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.. तर दुसरीकडे धुळे शहर विधानसभा मतदारसंघातून भाजप महायुतीचे उमेदवार असलेले अनुप अग्रवाल धुळ्यातून हिंदुत्वाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवत आहेत.. नुकताच गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांना मिळालेल्या तेली समाजाचा पाठिंबा या गोष्टी जरी निर्णायक असल्या तरी विधानसभा निकालानंतर या मतदारसंघात कोणाची वर्णी लागणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.