राजमुद्रा : विधानसभा निवडणुका तोंडावरून येऊन ठेपल्या असताना संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिला आहे ते बारामती विधानसभा मतदारसंघाकडे. या मतदारसंघात लोकसभेप्रमाणेच पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार असा सामना रंगणार आहे. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून युगेंद्र पवार तर त्यांच्या विरोधात उपमुख्यमंत्री अजित पवार रिंगणात आहेत.. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारांचा धुरळा उडवला जात असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या विधानांन राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आह.. अजितादादांनी ‘पवारांनंतर मीच’ असे वक्तव्य केले आहे. त्यामुळे या बारामतीत कोणता पवार पॉवर फुल ते निकालानंतर समोर येणार आहे..
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत बारामती मतदारसंघात अजित पवारांनी प्रचाराचा धडाका लावला असून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर ही निशाणा साधला आहे.. शरद पवार निवडणुकीला उभे आहेत की युगेंद्र पवार हे अगोदर सांगा असा टोला त्यांनी लगावला आहे. तर युगेंद्र याला लाखात कुठं टिंब देतात हे तर माहिती आहे का? असा टोला त्यांनी लगावला होता. त्यांनी शरद पवार यांच्या पत्नी आणि काकींवर पण प्रचारातून निशाणा साधला आहे. त्यातच आता ‘पवारांनंतर मीच’ या वक्तव्यांनी त्यांनी सर्वांच्या भुवया उंचावल्या.
दरम्यान पवार साहेबाचं वय झालं आहे. आता पवार निवडणुकीच्या रिंगणात नाही ते आता ‘पवारांनंतर मीच’ इथपर्यंत प्रचार येऊन ठेपला आहे. याआधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवारांना वयावरून टोला लगावला होता..त्यावर सुप्रिया सुळे यांच्यासह संजय राऊत यांनी शरद पवार यांच्याविषयी कोणी असं कसं बोलू शकतं, असा सवाल करत दोघांनी अजित पवार यांच्यावर टीका केली होती. त्यामुळे आता बारामती मतदारसंघात बाजी कोण मारणार ही विधानसभा निकालानंतर स्पष्ट होणार आहे.