पारोळा राजमुद्रा वृत्तसेवा | तालुक्यातील खेडीढोक गावात आमदार अनिल पाटील यांचे ग्रामस्थांनी जोरदार स्वागत केले व माजी आमदार वनश्री कृषिभूषण साहेबराव पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपणाचा कार्यक्रम झाला. यानिमित्ताने गावातून वृक्षदिंडी काढण्यात आली. यावेळी माजी पालकमंत्री सतीश पाटील, आ. अनिल पाटील, माजी आमदार साहेबराव पाटील या त्रिमूर्तींना ऐकण्यासाठी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती.
आ. अनिल पाटील यांनी ‘तुमच्या गावाच्या समस्या मी सोडवेल. येत्या काही महिन्यानंतर आपण कामांना सुरुवात करू.’ असे आश्वासन ग्रामस्थांना दिले. गावाचा पाणी तसेच पूर्णवेळ विजेच्या विषयावरही पाटील यांनी माहिती दिली. ‘आपल्याला राष्ट्रवादी पक्षात घेऊन जाणारे साहेबराव पाटील हेच आहेत. आज मला राष्ट्रवादी पक्षात असल्याचा सार्थ अभिमान वाटतो. भाजपाने व्यासपीठावर जागाही दिली नव्हती. त्यांचे अनेक ओझे मी उचलले मात्र त्यांना किंमत नव्हती.’ असेही त्यांनी सांगितले