राजमुद्रा : जळगाव शहर विधानसभा मतदारसंघातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गट आणि महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार जयश्री सुनिल महाजन यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला.
मेहरुण मधील जय भवानी शिक्षण मंडळ, मेहरुण संचलित सौ.कमलादेवी गोपालकृष्ण मणियार पूर्व प्राथमिक व प्राथमिक विद्यालयातील मतदान केंद्रावर सकाळी ७.१५ ला त्यांनी मतदान केले. मतदान केंद्राच्या बाहेर आल्यानंतर त्यांनी जळगावच्या विकासासाठी व प्रगतीसाठी मतदान करण्याचे आवाहन मतदारांना केले.
आज राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघासाठी मतदान होत आहे मतदानाला सकाळी सात वाजल्यापासून सुरुवात झाली असून प्रत्येक नागरिक मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावताना दिसत आहे.. संपूर्ण राज्यभरात ही मतदानाची प्रक्रिया राबवली जात आहे या निवडणुकीत राज्यातील 4136 उमेदवारांचे भवितव्य मतदान ठरवणार आहे..