राजमुद्रा : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज सकाळपासून मतदान सुरू झाल आहे.. अशातच आता सोलापूर दक्षिण मतदारसंघात (Solapur District Assembly Constituency) खासदार प्रणिती शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला झटका दिला आहे.. त्यांनी अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना थेट पाठिंबा देत त्यांना विजयी करण्याचे आवाहन जनतेला केल असल्यामुळे त्यांच्या भूमिकेमुळे ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे.
सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून ठाकरे गटाकडून उमेदवार देण्यात आला आहे. मात्र खासदार प्रणिती शिंदे आणि माजी मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आघाडीच्या अधिकृत उमेदवाराचा प्रचार न करता अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांच्यासाठी प्रचारात आघाडी घेतली होती. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने जागा वाटपात या मतदारसंघावर केलेला दावा चुकीचा असल्याचे सांगत आम्ही सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांच्या बाजूने मतदानाचे आवाहन केले असल्याचे सुशीलकुमार शिंदे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे..
या मतदारसंघातून अपक्ष असलेले धर्मराज काडादी यांना आम्ही पाठिंबा दिला आहे.. आम्ही आघाडी धर्म पाळला असून आम्ही एबी फाॅर्म दिलेला नाही. या जागेवरून काही गैरसमज झाले होते, चुकून गेलं असेल असं वाटलं, पण आम्ही काडादींच्या मागे आहोत. जो जिता वही सिकंदर होणार असून आम्ही पक्षाकडून एबी फाॅर्म दिला नाही, आघाडी धर्म पाळला आहे… सोलापूर दक्षिण हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे.. दरम्यान निवडणुकीच्या शेवटच्या क्षणी प्रणिती शिंदे यांच्या भूमिकेने ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे..