राजमुद्रा : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं काल मतदान पार पडलं शनिवारी मतमोजणी पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर पाचोरा मतदारसंघात पहिल्यांदाच खूप जास्त चुरस पाहायला मिळाली. या मतदारसंघात 12 उमेदवार रिंगणात होते.. शिंदे गटाचे किशोर पाटील आणि ठाकरे गटाच्या वैशाली सूर्यवंशी यांच्यात मुख्य लढत होती .. त्यामुळे पुन्हा एकदा ठाकरे गट आणि शिंदे गट आमने-सामने आले आहेत.. काल झालेल्या मतदानानंतर पाचोर्यामध्ये किशोर पाटील विजय होतील अशी शक्यता वर्तवली जात आहे..
या मतदारसंघात भाजपाने काँग्रेसचे उमेदवारांनी बंडखोरा करत अपक्ष ही निवडणूक लढवली होती.. तसेच दोन उमेदवारांनी पहिल्यांदाच अर्जही दाखल केला होता त्यामुळे ही निवडणूक खूप महत्त्वाची आणि चुरशीची ठरली.काल झालेल्या मतदानात पाचोरा मतदारसंघात 68.70 टक्के मतदान झाले.. या मतदारसंघात कोण आमदार होणार याकडेच राजकीय वर्तुळाचे लक्ष लागला आहे.. दरम्यान मिळालेल्या एक्झिट पोल नुसार पाचोरा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचा पारड जड असल्याचे दिसत आहे.. यामुळे शिंदे गटाचे किशोर पाटील हे संभाव्य आमदार असल्यासही बोलले जात आहे..
या मतदारसंघात ठाकरेच्या शिवसेनेच्या उमेदवार वैशाली सूर्यवंशी या शिवसेनेचे पाचोराचे दिवंगत माजी आमदार आर. ओ.पाटील यांच्या कन्या असून किशोर पाटील हे त्यांचे पुतणे आहेत.. आर ओ पाटील हयात असेपर्यंतच्या दोन्ही निवडणुकांमध्ये शिवसेनेचे खंदे कार्यकर्ते किशोर पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले होते.. मात्र या निवडणुकीत खुद्द वैशाली पाटील उतरल्याने बहीण आणि भाऊ यांच्यात लढत रंगली.. आता या विधानसभा निकालानंतर या मतदारसंघाचा आमदार कोण असणार हे स्पष्ट होणार आहे