राजमुद्रा : विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या समीकरणाची नांदी चर्चेत आहे.. नुकतचं विधानसभा निवडणुकीच मतदान पार पडल असून परवा दिवशी निकाल जाहीर होणार आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांन केलेल्या विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे..मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे एकत्र येतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे राजकीय समीकरणे बदलणार का? अशा चर्चांना उद्यान आलं आहे.
शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाठ यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीवर भाष्य करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच निर्णय घेऊ शकतात की शरद पवार यांच्यासोबत जायचे की नाही.. आम्हाला यावर भाष्य करता येणार नाही.. एकनाथ शिंदेसाहेब योग्य दिशेने जात असतात. आम्ही त्यांचा शर्ट पकडून जाऊ. एकनाथ शिंदे साहेब जो निर्णय घेतील. तो आम्हाला मान्य. ते जिकडं जातील तिकडं आम्ही त्यांच्यासोबत जाणार आहोत, असं शिरसाट म्हणाले. दरम्यान याआधी अजित पवार गटाचे नेते नवाब मलिक यांनीही अशा प्रकारचं विधान केलं होतं. कधीही काहीही होऊ शकतं असं मलिक म्हणाले होते
दरम्यान विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्यापासून महायुतीचा मुख्यमंत्री कोण असणारा चर्चांना उधाण येत होतं.. यावरही बोलताना संजय सोसायटी आणि असं म्हटलं आहे की, महायुतीचे नेते एकत्रित बसून मुख्यमंत्री कोण हे ठरवणार आहेत. 75% सर्वे आमच्या बाजूने आहेत. एकनाथ शिंदेंच्या चेहऱ्यावर आम्ही निवडणूक लढत आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील, असा आम्हाला विश्वास आहे.