राजमुद्रा : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असताना महाराष्ट्रातील हायव्होल्टेज लढतींपैकी एक असलेल्या माहिममध्ये ठाकरेंनी मोठी खेळी केली आहे.. या मतदारसंघातील नेते असलेले भाजपाचे सचिव सचिन शिंदे यांनी आज शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे..
निवडणुकीच्या निकाला आधी भाजपाच्या सचिवांनी ठाकरे गटात प्रवेश केल्याने निवडणुकीत सदा सरवणकर आणि मनसे नेते अमित ठाकरे यांना जाणारी रसद ठाकरेंच्या कामी आल्याची चर्चा सुरु झाली आहे. माहिममध्ये मनसे प्रमुख राज ठाकरेंचा मुलगा उभा असल्याने देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार यांनी मनसेला मदत करण्याची भूमिका घेतली होती. तर महायुतीत शिंदेंनी सदा सरवणकरांना उमेदवारी देत माघारही घेतली नव्हती. यामुळे येथील निवडणूक सरवणकर वि. अमित ठाकरे अशीच रंगविली गेली होती. त्यानंतर आता या निवडणुकीच्या निकाला आधीच भाजपच्या बड्या नेत्यांनी ठाकरे करतात प्रवेश केल्याने चर्चांना उधाण आला आहे..
मुंबई भाजपचे सचिव सचिन शिंदेंच्या हाती मशाल आली असून उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे. यावर ठआकरेंनी शिंदे यांचे शिवसेनेत स्वागत करत असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान भाजपाचे सचिव सचिन शिंदे यांनी ठाकरे घरात प्रवेश केल्यानंतर आपली व्यथा मांडली.. ते म्हणाले, भाजपाकडून त्यांच्यावर अन्याय झाला नाही पण न्यायही मिळाला नाही. असे त्यांनी म्हटले.. त्यांच्या पक्षप्रवेशानंतर प्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, मी तुम्हाला शब्द देतो की तुम्हाला पश्चाताप होणार नाही. मी तुम्हाला जनतेपर्यंत पोहचण्याची संधी देईन, असा शब्द ठाकरे यांनी दिला.