राजमुद्रा : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदानानंतर संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिल आहे ते उद्याच्या निकालाकडे. निकालासाठी अवघे काही तास शिल्लक असतानाच बारामतीत अजित दादांच्या लावलेल्या फलकाने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आला आहे… ‘मी अजित आशाताई अनंतराव पवार ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून…’ असा मजकूर या बॅनरवर छापण्यात आला आहे. या बॅनरची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी नुकतंच मतदान झालं यानंतर उद्या मतमोजणी होणार असून दुपारपर्यंत सर्व चित्र स्पष्ट होणार आहे.. उत्साही कार्यकर्त्यांकडून नेत्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत असताना दुसरीकडे बारामती मतदारसंघात अजितदादांच्या बॅनरची चर्चा..नदीम शेख मित्रपरिवाराच्या वतीनं बारामतीतील भिगवन रस्त्यावर हा फलक लावण्यात आला आहे. बारामती भिगवन रस्त्यावर सहयोग सोसायटी जवळ हा फलक लावण्यात आलेला आहे. या फलकामध्ये भावी मुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांचा उल्लेख करण्यात आला आहे.
दरम्यान दुसरीकडे निवडणूक निकालापूर्वीच सोलापूर शहर उत्तर मध्ये भाजप उमेदवार विजयकुमार देशमुख यांच्या विजयाचे बॅनर झळकले आहेत. भाजप उमेदवार विजयकुमार देशमुख यांच्या समर्थकांकडून ‘विजयी भव:’चे बॅनर लावण्यात आले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे..
संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या बारामती मतदारसंघात पवार विरुद्ध पवार असा सामना रंगला.. या विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवार गटाकडून योगेंद्र पवार तर स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्या विरोधात रिंगणात होते.. त्यामुळे या मतदारसंघात चुरस निर्माण झाली. त्यामुळे बारामती मतदारसंघात गुलाल कुणाचा उधळणार आहे उद्याच्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे..