राजमुद्रा : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना पूर्वसंध्येला भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटत असल्याचा आरोप करण्यात आला होता.त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती.. आता याच प्रकरणी विनोद तावडे ॲक्शन मोडवर आले असून त्यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे.
या प्रकरणावर विनोद तावडे यांनी असे म्हटले आहे की, काँग्रेसला फक्त माझी आणि माझ्या पक्षाशी बदनामी करायची होती.. गेली 40 वर्षे मी राजकारणात आहे पण मी काहीही असे केले नाही.. सामान्य कुटुंबीयातून मी आलो आहे.. त्यामुळे काँग्रेसने खोटेदावे माध्यमांसमोर आणि जनतेसमोर मांडले म्हणून मी त्यांना न्यायालयाची नोटीस बजावून जाहीर माफी मागावी अन्यथा कारवाईला सामोरे जावे असे सांगितले आहे.. असं त्यांनी म्हटलं आहे.. दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या निकाला आधीच त्यांनी केलेल्या कायदेशीर नोटीसीने काँग्रेस चांगलाच अडचणीत आला आहे..
नुकताच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे मतदान पार पाडलं.. उद्या या होणाऱ्या निकालाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असताना भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे यांनी काँग्रेसला पाठवलेल्या कायदेशीर नोटिसांनी चर्चाना उधाण आला आहे.. नोटीस मिळाल्यापासून 24 तासाच्या आत या तिन्ही त्यांनी विनोद तावडे यांची बिनशरथ माफी मागावी असे त्यात म्हटला आहे.. आता यावर काँग्रेस काय उत्तर देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे..