राजमुद्रा : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल येण्यास हळूहळू सुरुवात झाली आहे.. या निकालामध्ये जळगाव जिल्ह्यातील 11 मतदारसंघाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिला आहे.. यामधील अमळनेर मतदार संघातील निकालाचा पहिला कल हाती आला असून या मतदारसंघात महायुतीने सरशी मारली आहे.. महायुतीचे उमेदवार मंत्री अनिल पाटील 4900 मतांनी आघाडीवर आहेत.. तर अपक्ष शिरीष चौधरी दुसऱ्या स्थानी आहेत.
या अमळनेर मतदारसंघात महायुतीचे उमेदवार मंत्री अनिल पाटील यांच्या विरोधात काँग्रेसचे डॉक्टर अनिल शिंदे त्याचबरोबर भाजपचे बंडखोर नेते अपक्ष शिरीष चौधरी रिंगणात होते.. या मतदारसंघात गुलाल कोणाचा उधळणार हे अंतिम कला नंतर समोर येणारच आहे.. मात्र पहिल्या कलानुसार या मतदारसंघात महायुतीचे सरशी मारली आहे..