जळगाव राजमुद्रा वृतसेवा | खाजगी शाळेच्या मनमानी “फी” पासून सर्वसामान्य पालकांना दिलासा मिळावा म्हणून महाराष्ट्र विद्यार्थी संघटना पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी अभिजित राउत यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. त्यानंतर निवेदनाची एक प्रत शिक्षण सभापती रविंद्र पाटील व शिक्षणाधिकारी भा. शि. अकलाडे, उपशिक्षणाधिकारी डॉ. डिगंबर देवांग यांची भेट घेऊन सादर केले.
निवेदनात म्हटले आहे की, कोविड – १९ च्या या पार्श्वभूमीवर जे आर्थिक संकट आले आहे, त्यात सामान्य माणूस होळपळून निघाला आहे. काही खासगी शाळा मनमानी पध्दतीने आधी ज्या प्रकारे फी आकारात होते, त्याच पद्धतीने आता आकारून त्यांची आर्थिक पिळवणूक करीत आहे. पालकांनी का म्हणून इतर “फी” द्यायची? असा सवालही त्यांनी केला आहे. तरी प्रशासनाने याकडे लक्ष घालून खाजगी शाळांची अवाजवी फी कमी करून फक्त ट्युशन फी घ्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा महाराष्ट्र विद्यार्थी संघटना आंदोलन छेडेल असा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी महाराष्ट्र विद्यार्थी संघटनेचे प्रदेश कमिटी सहसचिव दिपक सपकाळे, खान्देश विभाग प्रमुख अँड. अभिजित जितेंद्र रंधे, खान्देश विभाग उपाध्यक्ष सचिन बिऱ्हाडे, खान्देश विभाग सचिव चेतन चौधरी, जिल्हाध्यक्ष रोहन महाजन, संदीप कोळी उपस्थित होते.