राजमुद्रा : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल हळूहळू समोर येत असताना बी फाइट असलेल्या बारामती मतदारसंघाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलं होतं.. या निवडणुकीच्या मतमोजणीच्या सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे पुतणे व राष्ट्रवादी (शरद पवार)चे उमेदवार युगेंद्र पवार यांच्याविरोधात आघाडी घेतली आहे. या मतदारसंघात मतदारांनी अजित पवारांना पसंती दिली असल्याने बारामती विधानसभा मतदारसंघात कार्यकर्त्यांनी जल्लोष करण्यास सुरुवात केली आहे..
पवार कुटुंबीयांचा बालेकिल्ला असलेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाकडे राज्याचे लक्ष लागलं होतं.. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीची उमेदवार अजित पवार विरुद्ध त्यांचे पुतणे आणि महाविकास आघाडीचे नेते युगेंद्र पवार अशी लढत पाहायला मिळाली.. त्यामुळे पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार असा सामना लोकसभेनंतर विधानसभेत ही रंगला..अजित पवार या पवार कुटुंबीयांच्या बालेकिल्ल्यात आपल्या पुतण्याविरुद्ध विजय मिळवून आठव्यांदा विजयी होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत. मतमोजणीतील अजित पवारांनी घेतलेली आघाडी पाहता, आता बारामतीत त्यांच्या समर्थकांनी निकालाआधीच विजयाचा गुलाल उधळला आहे.