राजमुद्रा : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल आज लागत असून बीड जिल्ह्यातील परळी मतदारसंघात हाय व्होल्टेज लढत पाहायला मिळाली..या मतदारसंघात महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राजेसाहेब देशमुख यांच्या थेट लढत झाली.. मात्र या निवडणुकीसाठी शरद पवार स्वतः मैदानात उतरल्यामुळे मुंडेंचं टेन्शन वाढलं होतं पण आता पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांनी परळीत बाजी मारली असून शरद पवार यांना मोठा धक्का बसला आहे..
बीड जिल्ह्यातील सर्वात मोठा विजय धनंजय मुंडेंचा झाला आहे. धनंजय मुंडेंना 50 हजारांपेक्षा जास्त मताधिक्य मिळाल्याचे दिसून येते. तर, महाविकास आघाडीचे राजेसाहेब देशमुख यांचा पराभव झाला आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत बीड जिल्ह्यातही वेगळंच चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे, जिल्ह्यातील परळी विधानसभा (Parli Vidhansabha) मतदारसंघात नेमकं काय होणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली होती. अखेर या मतदारसंघात मुंडेंनी बाजी मारली असून शरद पवारांचा दारुण पराभव केला आहे..
. लोकसभा निवडणुकीत बीड मतदारसंघात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या तुतारी चिन्हावर मराठा उमेदवार असलेल्या बजरंग सोनवणे यांनी 6500 मतांनी विजय मिळवला होता. त्यांनी भाजप महायुतीच्या पंकजा मुंडेंचा पराभव केला होता. मात्र, त्यांना परळी विधानसभा मतदारसंघात 70 हजारांपेक्षा अधिकचं मताधिक्य होतं. त्यामुळे, धनंजय मुंडेंचं पारडं जड आहे.