राजमुद्रा : अवघ्या देशाचं लक्ष लागून राहिलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालात महायुतीने बाजी मारली..या निवडणुकीत महाविकास आघाडीला धोबीपछाड करत महायुतीन बहुमत मिळवल. आता या महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.. महायुती सरकार मध्ये मुख्यमंत्री पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार तसेच कोणाला मंत्रीपदी मिळणार याची उत्सुकता राजकीय वर्तुळात शिगेला पोहोचली आहे.. दरम्यान महायुती सरकारचा शपथविधी सोहळा उद्या सोमवारी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महायुतीच्या सरकारचा शपथविधी सोहळ्यात मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांची शपथ घेणार आहे. हा सोहळा राजभवनात होण्याची दाट शक्यता आहे. तूर्तास फक्त मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी होणार आहे. या निवडणुकीत भाजपच अधिक वर्चस्व आहे..भाजपचे सध्या १३२ आमदार आहे. त्यामुळे भाजपच्या वाट्याला २२-२४ मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या ५७ जागा आल्याने त्यांच्या वाट्याला १०-१२ मंत्रिपदे येण्याचा अंदाज आहे. राष्ट्रवादी कांग्रेसला ४१ जागा आल्याने त्यांच्या वाट्याला ८-१० मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान मंत्रिमंडळ विस्तारावर महायुतीचे प्रमुख तिन्ही नेते बसून चर्चा करणार असल्याची माहिती मिळाली.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालात शिंदेंच्या शिवसेनेला पसंती देत बाळासाहेब ठाकरे यांचा विचार जनता अजूनही मानते असं दिसून आलं..मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवली होती. त्याला महाराष्ट्रामधून प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. असे दीपक केसरकर यांनी सांगितले. दरम्यान महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्यात कोण शपथ घेणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागला आहे..