राजमुद्रा : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर महायुती चागलीच ॲक्शनमोड मध्ये आली आहे.. राज्यात सत्ता स्थापनेसाठी महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या असून राज्यात एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री पदाचा पॅटर्न कायम राहणार आहे.. मिळालेल्या माहितीनुसार भाजप महायुतीच्या मुख्यमंत्रीपदा चेहरा असणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.. यासाठी सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी आमदारांची रेलचेल वाढली आहे . तसेच या नव्या सरकारमध्ये नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेनेकडून मंत्री पदासाठी संजय शिरसाठ, भरत गोगावले, विजय बापू शिवतारे, विठ्ठलराव लंघे,अपक्ष शरद सोनवणे यांच्या नावावर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे..
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालात महायुतीने थेट महाविकास आघाडीला धोबीपछाड करत 230 चा आकडा गाठला. यानंतर राजकीय गोत्यात सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग आला असून सर्व आमदार सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत.. सूत्रांच्या मिळालेल्या माहितीनुसार केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ गेल्या दोन तासापासून सागर बंगल्यावर असून सागर काकडे यांच्यासह पोलिस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी देखील त्यांची भेट घेतली आहे.. त्यामुळे लवकरच महायुतीची सत्ता स्थापली जाणार आहे..
या नव्या सरकारमध्ये माजी मंत्र्यांना डच्चू मिळणार असून नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे.. त्यामुळे महायुतीच्या सरकारमध्ये येत्या मंत्रिमंडळ विस्तारात माधुरी मिसाळ यांना मंत्रिपद मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.. दरम्यान विजयी उमेदवार आणि विद्यमान आमदार माधुरी मिसाळ यांनीही देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे.. त्यामुळे माहिती सरकारकडून त्यांना राज्यमंत्रीपद दिले जाण्याची शक्यता आहे.. महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात कोणाकोणाची वर्णी लागणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागला आहे..
दरम्यान महायुतीच्या सत्ता सपनेच्या संदर्भात तसेच दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांची भेट घेण्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर पोचले आहेत.. त्यामुळे या बैठकीत काय होणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.