राजमुद्रा : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा शनिवारी निकाल झाला..या निकालात रावेर-यावल विधानसभा मतदारसंघातून भाजप महायुतीचे अमोल जावळे यांनी दणदणीत विजय संपादित केला. या मतदार संघातील भाजपाच्या विजया पाठीमागे मंत्री गिरीश महाजनांच्या शिलेदाराचा सिंहाचा वाटा मोलाचा ठरला..महाजनांनी मतदार संघाची जबाबदारी शिलेदार अरविंद देशमुख यांच्याकडे सोपवली. गल्लोगल्ली प्रचार करून मायक्रो नियोजन करीत त्यांनी आपली खेळी यशस्वी करून दाखवली.
भाजप संकटमोचक मंत्री गिरीश महाजन यांनी यारा वेरी यावल मतदार संघाची जबाबदारी त्यांचे आरोग्यदूत अरविंद देशमुख यांच्यावर सोपवली होती.. त्यांनी या मतदारसंघात भाजपला विजय खेचण्यासाठी 42 दिवस या ठिकाणी मुक्काम करून रणनीती आखली.. अखेर त्यांच्या नियोजनाने या मतदार संघात भाजपचा विजयाचे ते खरे चाणक्य ठरले..भाजपाच्या रावेरमध्ये गेल्यावेळी पराभूत झालेल्या भाजपला पुन्हा यश मिळवून देण्यासाठी मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिष्ठा पणाला लावली. या मतदारसंघात भाजपचे उमेदवार अमोल हरिभाऊ जावळे यांना उमेदवारी मिळाल्यानंतर त्या मतदारसंघातील नियोजनाची जबाबदारीचे पूर्णपणे मायक्रोन नियोजन आरोग्यदूत अरविंद देशमुख यांनी केले. त्यांच्या नियोजनाने आणि चाणक्य नीतीने भाजपाला या मतदारसंघात यश मिळाले.. अमोल हरिभाऊ जावळे यांचा दणदणीत विजय झाला.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत रावेर मतदार संघात यंदा पंचरंगी लढतीचे चित्र दिसून आले होते. यात काँग्रेसचे आमदार शिरीष चौधरी यांनी यंदा निवडणूक न लढता पुत्र धनंजय चौधरी यांना उमेदवारी दिली होती. तर भाजपचे स्वर्गीय खासदार हरिभाऊ जावळे यांचे पुत्र अमोल जावळे हे भाजपच्या तिकिटावरून रावेर विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. भाजपाचे ज्येष्ठ नेते गिरीश महाजन यांनी त्यांचे उमेदवारी जाहीर केली होती. मतदार संघात गेल्या वेळी ४५ हजार मते घेणाऱ्या प्रहार संघटनेचे अनिल चौधरी यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केला होता. माजी नगराध्यक्ष दारा मोहम्मद यांनी अपक्ष तर वंचित बहुजन आघाडीतर्फे शमिभा पाटील यांनी उमेदवारी दाखल केल्याने या मतदार संघात चुरस वाढली होती
या रावेर मतदारसंघात.ठिकठिकाणी गावात कॉर्नर सभा आणि जाहीर सभांमधून अमोल जावळे यांना विजयी करण्याचे आवाहन महाजनांच्या आरोग्यदुतानीं केले. अथक परिश्रम आणि मायक्रो नियोजनामुळे अरविंद देशमुख यांचा अमोल जावळे यांच्या विजयात निश्चितच सिंहाचा वाटा म्हणावा लागणार आहे.