राजमुद्रा : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळालं.. या यशाच श्रेय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या लाडक्या बहिणीनां दिल आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी शेकडो लाडक्या वहिनी त्यांचं औक्षण करण्यासाठी पोचल्या होत्या.. यावेळी त्यांनी आता लाडक्या बहिणींना 1500 रुपये नाही तर 2100 रुपये मिळणार असल्याचं जाहीर केल आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुतीने लाडकी बहीण योजनेंतर्गत २१०० देण्याचं आश्वासन दिलं होत. निडणुकीत महायुतीला मोठं यश मिळाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याचं श्रेय लाडक्या बहिणींना देत त्यांना एकवीसशे रुपये मिळणार असल्याचा सांगितलं..यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले की, राज्यात लाडकी बहीण योजना सुपर हिट झाली आहे. निवडणुकीत एक दैदिप्यमान विजय आपल्याला मिळाला आहे. विरोधकांना विरोधी नेता बनवायला संख्याबळ नाही. लाडक्या बहिणींनी लाट होती आणि त्यात विरोधक वाहून गेले. हा चमत्कार लाडक्या बहिणींनी केला आहे. त्यामुळे हा लाडका भाऊ तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. लाडकी बहीण योजनेंतर्गत १५०० नाही तर २१०० रुपये देणार असल्याचं शिंदे यांनी म्हटलं आहे.