राजमुद्रा : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीचा दणदणीत विजय झाल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला काहीच जागा उरली नाही.. या विधानसभा निवडणुकीत मनसेला अपेक्षित यश न मिळाल्याने राज ठाकरे यांचं टेन्शन वाढल आहे.. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मनसेला एकही जागा न मिळाल्याने मनसेचे इंजिन धोक्यात आलं असून पक्षाची मान्यता ही रद्द होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे..
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेनंतर मनसेचा एक ही विजयी आमदार या निवडणुकीत दिसून आला नाही..२००९ ला १३, २०१४ आणि २०१९ ला प्रत्येकी एक तर यंदा २०२४ ला एकही आमदार निवडून आला नाही. दरम्यान माहीम विधानसभा मतदारसंघात राजपुत्र अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात होते त्यांचाही या निवडणुकीत पराभव झाला.. दरम्यान या विधानसभा निवडणुकीत भाजपचं सरकार आमच्या मदतीने येण्याचा दावा करणाऱ्या राज ठाकरे यांच्या मनसे या पक्षाची मान्यता रद्द होण्याची शक्यता आहे.
उद्धव ठाकरे यांच्या हातून शिवसेना गेल्यानंतर आता राज ठाकरे यांच्या मनसेचं चिन्ह सुद्धा धोक्यात आलं आहे. यंदा विधानसभा निवडणुकीला एकही आमदार निवडून आला नाही. त्यात त्यांची टक्केवारी घटल्याने त्यांच्या पक्षाची मान्यता रद्द होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राचं सरकार मनसेशिवाय बसू शकत नाही असा दावाही त्यांनी केला होता.. मात्र या निकालात त्यांचं काहीच नसल्याचे दिसून आलं.. त्यांच्या आमदारांचा एकही विजय नसल्याने राज ठाकरेंचा पक्ष आणि चिन्ह ही धोक्यातच आला आहे..