राजमुद्रा : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालात राज्यभरात महायुतीचा दणदणीत विजय झाला.. या विजयात खान्देशातील जळगाव, धुळे व नंदुरबार या जिल्ह्यांतही महायुतीची लाट दिसून आली.महायुतीने खान्देशात जिंकलेल्या १९ जागांपैकी भारतीय जनता पक्षाने ११, शिंदेसेनेने ७ आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने एक जागा जिंकली आहे. २०१९ च्या तुलनेत खान्देशात महायुतीने पाच जागा अधिक कमावल्या आहेत. त्यात अक्कलकुवा, धुळे शहर, धुळे ग्रामीण, रावेर आणि मुक्ताईनगरचा समावेश आहे.
या विधानसभा निवडणुकीत उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, धुळे या तिन्ही जिल्ह्यात महाविकास आघाडीची पाटी कोरी राहिली.. इतिहासात पहिल्यांदाच जळगाव व धुळे जिल्ह्यात काँग्रेसला खातेसुद्धा उघडता आले नाही. खान्देशातील २० जागांपैकी केवळ नवापूरची जागा सोडली तर इतर १९ च्या १९ जागा महायुतीने जिंकल्या. या निवडणुकीत महाविकास आघाडीचा साफसुकडा होत असताना नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर मतदारसंघातून विजय मिळवत काँग्रेसचे शिरीष नाईक यांनी आघाडीला वाचवले.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालात जळगाव आणि धुळ्यात महायुतीने घवघवीत यश मिळवलं.. या ठिकाणी माजी मंत्री, माजी खासदार यांचा या निवडणुकीत पराभव झाला असून खानदेशातील चार उमेदवारांना पहिल्यांदाच आमदारकीचा मान मिळाला आहे. यामध्ये जळगाव जिल्ह्यातील एरंडोल चे अमोल पाटील, रावेर ग्रामीणचे अमोल जावळे, धुळे शहराचे अनुप अग्रवाल, आणि धुळे ग्रामीणचे राम भदाणे हे पहिल्यांदाच आमदार झाले आहेत.
दरम्यान या निकालात भाजप हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला असून तब्बल 132 जागावर भाजपने दणदणीत विजय मिळाला आहे.. तर एकनाथ शिंदे यांचा पक्ष दुसरा 57 जागांवर विजय मिळवला आहे तर अजित पवार यांनी 41 जागावर विजय मिळवला आहे. उत्तर महाराष्ट्रात ही महायुतीने जादू केली असून महाविकास आघाडीला धोबीपछाड केला आहे..